राष्ट्रीय कॉल सेंटर : +91-11-23978046 | राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष : 020 26127394 | टोलफ्री हेल्पलाइन : 104

कोरोना (कोविड-१९)

जगभरात थैमान घालणारा कोरोनाच्या प्रतिबंधासाठी महाराष्ट्र शासन सरसावले आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. या आजाराच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे.

कोरोना नेमका काय आहे ते समजून घेऊ : कोरोना हे विषाणू समुहाचे नाव आहे. २००३ मध्ये आढळून आलेला सार्स  किंवा २०१२ मधील मर्स हे आजार कोरोना विषाणूमुळे होणारे आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान प्रांतात कोरोना विषाणू आढळला तो यापूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा वेगळा आहे. म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने त्याला ‘कोविड १९’ असे नाव दिले. 

कोरोनाचा प्रसार कसा होतो : शिंकण्यातून आणि खोकण्यातून जे थेंब बाहेर पाडतात त्यातून हा आजार पसरतो. हे उडालेले थेंब आजुबाजुला पृष्ठभागावर पडतात. त्याला स्पर्श झाला तर ते हाताला चिकटतात. ते हात जर वारंवार चेहरा, डोळे, नाक याला लावला गेले तर आजार पसरतो. 

  • सध्या कोरोना आजारावर औषध अथवा लस उपलब्ध नाही. लक्षणानुसार रुग्णावर उपचार केले जातात.
  • ताप, सर्दी, कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे आढळून येतात.
  • कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी हात साबण अथवा सॅनिटायजरने धुतले पाहिजे. शिंकताना किंवा खोकताना नाका, तोंडावर रुमाल किंवा टिश्यू पेपर धरावा.
  • अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खावू नये

महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी काय केले जात आहे : 

  • साधारणत: १८ जानेवारी २०१९ पासून मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोरोना बाधीत देशातून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी करण्यास सुरूवात झाली. ज्यांना सौम्य लक्षणे आढळून आली अशा प्रवाशांचा राज्याच्या आरोग्य विभागामार्फत १४ दिवसांपर्यंत पाठपुरावा केला जात होता.
  • दि. ९ मार्च रोजी पुण्यात पहिल्यांदा २ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यांचा दुबई प्रवासाचा इतिहास होता. राज्यात सुरूवातीला मुंबई, पुणे आणि नागपूर येथे कोरोनाच्या चाचणीची सुविधा होती. ती आता टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आली असून कस्तुरबा रुग्णालय, केईएम, येथेही ही सुविधा आता सूरू झाली आहे. त्याचबरोबर खासगी आठ प्रयोगशाळांना देखील  चाचणी करण्यासठी केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. 
  • कोरोना रुग्णांवर जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र शासनाच्या सूचनेनुसार उपचार केले जातात. कोरोनाबाधीत रुग्णांना रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेऊन लक्षणानुसार उपचार केले जात आहेत.
  • ज्या प्रवाशांचा परदेश प्रवासाचा इतिहास आहे अथवा बाधीत रुग्णांच्या संपर्कात आहेत त्यांना घरीच क्वारंटाईनच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आयोसोलेशन वॉर्ड करून ठेवण्यात आले आहेत.


कोरोनाबाधित रूग्ण

किमान एक रूग्ण आढळलेल्या क्षेत्रातील कोरोना बाधीत रूग्णांची आकडेवारी...