राष्ट्रीय कॉल सेंटर : +91-11-23978046 | राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष : 020 26127394 | टोलफ्री हेल्पलाइन : 104

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत लसीकरणास प्रारंभ

 

मुंबई, दि १६ : कोरोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ म्हणजे कोरोना विरोधातील लढाईचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज असून ही मोहीम राज्यात प्रभावीपणे राबविली जाईल, असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले. केंद्र शासनाने मोफत लस देण्याच्या यादीत दारिद्र रेषेखालील घटकांचा समावेश प्राधान्याने करावा अशी मागणी राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी केली.

 

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ ग्रामीण रुग्णालयामध्ये श्री. यड्रावकर यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ झाला. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह माने, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, पंचायत समिती सभापती कविता चौगुले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंभोजकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दातार, शिरोळचे नगरसेवक यांच्यासह विविध मान्यवर आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

टप्प्याटप्प्याने विविध यंत्रणेतील घटकांपर्यत ही लसीकरण मोहीम पोहोचेल आणि ही लस कोरोना विरोधातील युद्धात ढालीसारखे काम करेल, असेही राज्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर जाऊन पाहणी केली तसेच राज्यातील लसीकरण मोहीम केंद्रावरील परिस्थितीचा आढावा घेत घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

००००

 


कोरोनाबाधित रूग्ण

किमान एक रूग्ण आढळलेल्या क्षेत्रातील कोरोना बाधीत रूग्णांची आकडेवारी...