राष्ट्रीय कॉल सेंटर : +91-11-23978046 | राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष : 020 26127394 | टोलफ्री हेल्पलाइन : 104

कोरोनाच्या प्रभावी नियंत्रणासाठी नॉर्वेच्या वाणिज्यदूतांनी केले भारताचे कौतुक

 

मुंबई, दि. ५ : नॉर्वेचे मुंबईतील वाणिज्यदूत आर्नी जान फ्लोलो यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

भारताशी व्यापार, हरित ऊर्जा, सागरी अभ्यास व पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढविण्याबाबत यावेळी चर्चा झाली. मोठी लोकसंख्या असलेला एक खंडप्राय देश असून देखील भारताने कोरोनाचा मुकाबला अतिशय समर्थपणे केला, तसेच कोरोनाविरोधी लस निर्मिती करून जगाला भयमुक्त केल्याबद्दल आर्नी जान फ्लोलो यांनी यावेळी भारताबद्दल प्रशंसोद्गार काढले.

000

 


कोरोनाबाधित रूग्ण

किमान एक रूग्ण आढळलेल्या क्षेत्रातील कोरोना बाधीत रूग्णांची आकडेवारी...