राष्ट्रीय कॉल सेंटर : +91-11-23978046 | राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष : 020 26127394 | टोलफ्री हेल्पलाइन : 104

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९’ साठी विशाल पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेकडून मदत

 

मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्द

मुंबई दि. 14: ‘कोरोना’च्या लढ्यासाठी ‘विशाल पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मार्केट यार्ड पुणे’ या संस्थेने एक लाख 11 हजार 111 रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी दिला आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष सौरभ कुंजीर, अॅड. भगवानराव साळुंखे यांनी मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे येथे सुपुर्द केला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘कोरोना’ संकटाचा सामना करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या उपाययोजनांसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19’ हे स्वतंत्र बँक खाते उघडले आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारसोबत अनेक व्यक्ती, औद्यागिक संस्था, स्वयंसेवी संस्था,  धार्मिक संस्था, वित्तीय संस्था पुढे येत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री  यांनी समाजाच्या विविध क्षेत्रातील संस्थांना आणि व्यक्तींना यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत  ‘विशाल पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मार्केट यार्ड पुणे’ संस्थेच्या वतीने एक लाख 11 हजार 111 रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी देण्यात आला आहे

 

वर्गीकरण


कोरोनाबाधित रूग्ण

किमान एक रूग्ण आढळलेल्या क्षेत्रातील कोरोना बाधीत रूग्णांची आकडेवारी...