खबरदारी
- मास्कचे प्लिट खालील बाजूस उघडा व नाक, तोंड आणि हनुवटी झाकून जाईल अशा पद्धतीने लावावा.
- नाकावर ठेवण्यायोग्य भाग नाकाच्या हाडावर बसवा. वरील दोरीस खालील दोरी बांधलेली असून दोरी कानाच्या वरून मानेच्या मागील बाजूस घेऊन बांधावी.
- आपला चेहरा व मास्क यामध्ये अंतर असू नये याची खात्री करा.
- मास्क खाली खेचू नका किंवा मानेला लटकता ठेऊ नका.
- मास्क वापरत असताना त्याला सतत स्पर्श करणे टाळा.
- मास्क काढण्यासाठी योग्य पद्धतीचा वापर करा. (मास्क मागील बाजूने काढा. मास्कच्या पुढील भागाला स्पर्श करू नका.) प्रथम दोरीचा खालचा भाग व त्यानंतर वरचा भाग काढा आणि दोरीच्या वरच्या बाजूचा वापर करून मास्क हाताळा. मास्क काढताना इतर पृष्ठभागास स्पर्श करू नका.
- मास्क अधिक ओलसर / फेकण्याजोगा झाल्यास तो त्वरित बंद कचरापेटीत फेकून द्यावा. व नवीन मास्कचा वापर करावा. एकदाच वापरावयाचा मास्क पुन्हा वापरू नये.
- मास्क काढल्यानंतर किंवा जेव्हा आपण अनवधानाने त्याला स्पर्श करतो तेव्हा त्वरित आपले हात साबण व पाणी वापरून स्वच्छ धुवा. एकदाच वापरण्यायोग्य मास्क पुन्हा वापरू नये. काढल्यानंतर त्याची घरगुती ब्लीच सोल्युशनमध्ये भिजवून त्वरित बंद कचरापेटीत फेकून विल्हेवाट लावावी.
मास्कचा वापर तेव्हाच करावा, जेव्हा
- आपल्याला कोरडा खोकला किंवा ताप असल्यास
- आपण आरोग्य सुविधा केंद्रास भेट देत असाल
- आपण एखाद्या आजारी व्यक्तीची काळजी घेत असाल आणि बाधित व्यक्तीच्या खोलीत प्रवेश करत असाल